लक्षणं ... (joke) - Ratnagiri District

माझा रत्नागिरी जिल्हा My District

Tuesday, July 28, 2020

लक्षणं ... (joke)

झंप्या कोरोनाची चाचणी करायची म्हणुन हॉस्पिटलमध्ये गेला. 
बरीच गर्दी आहे म्हणुन वेटींग मधे बसला आणि इकडं तिकडं पाहु लागला.
कोरोनाची लक्षण उपचार काळजी घेण्यासंबंधी अनेक पोस्टर तिथं लावलेली होती.
त्यानं ती वाचुन काढली सगळी काळजीपूर्वक.
त्याचा नंबर आला म्हणुन डॉक्टर त्याला घ्यायला बाहेर आले तर हा जोर जोरानं ओरडुन म्हणायला लागला :

"माझी टेस्ट करु नका,
मी नक्कीच कोरोना पॉझिटिव्ह आहे या पोस्टरमधे लिहिलेली सगळी लक्षण माझ्यात आहेत.
मला अन्नावर वासना राहिली नाही,
मळमळतं ,
पोटात हलतं ,
उलट्या होतात...
हे सगळं मला होतंय...!"

त्यावर डॉक्टरांनी तो चार्ट नीट निरखुन पाहिला आणि त्याला म्हणाले :

"अरे हा चार्ट चुकुन इथं तसाच राहिलाय...
काढला गेला नाही...
.
.
.
.
.
.
ही सगळी गरोदर बाईची लक्षणं आहेत..!"

जास्त विचार केलं की असं होतं...
म्हणुन अनावश्यक बातम्या आणि माहितीकडं दुर्लक्ष करा...
आणि सुरक्षित रहा...!!

No comments:

Post a Comment